या शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी भरपाई?

        
                     WhatsApp Group                                Join Now              
    
                     Telegram Group                                Join Now              
    
                     Instagram Group                                Join Now              

Compensation for damages : महाराष्ट्र राज्य सरकारने निवडणूक तोंडावर असताना शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जानेवारी 2024 पासून ते मी 2024 या काळामध्ये राज्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल होते. ही नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी 596 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील 16 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.Compensation for damages

लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र होणार जमा

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करता या नुकसान भरपाईसाठी हे स्पष्ट निकष निश्चित केले आहेत. 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्याला कमाल तीन हेक्टर जमीन क्षेत्राच्या मर्यादित ही मदत मिळणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असणे महत्त्वाचे आहे. पारदर्शकता राखण्यासाठी म्हणून थेट लाभ हस्तांतरण पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. ज्यामुळे ही रक्कम शेतकऱ्याच्या थेट खात्यामध्ये जमा होईल व शेतकऱ्याला मदत होईल.

लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र होणार जमा

या योजनेच्या अंतर्गत राज्यातील 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. ती जिल्हे म्हणजे अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव सोलापूर, अमरावती, पुणे, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, गोंदिया, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या या नुकसानीचे प्रभावित प्रमाण शेतकऱ्यांची संख्या आणि पिकाचे झालेले नुकसान या गोष्टीचा सखोल विचार करण्यात आला आहे.

डिजिटल क्रांतीचा फायदा घेत राज्य सरकारने या योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि सुलभ केली आहे. सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची यादी सरकारने ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेली आहे. ही यादी कोणत्याही शेतकऱ्याला स्वतःच्या मोबाईलवरून किंवा संगणकावरून सहजपणे डाउनलोड करता येईल. या योजने संदर्भातील सविस्तर माहिती असलेला शासन निर्णय (जीआर) देखील ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र होणार जमा

या झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते आणि शेतकऱ्यांची तर पिकच पिकं वाया गेले होते तर काहींच्या पिकाची अंशीक नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना खूप मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते. प्रत्येक शेतकऱ्याला पुढील हंगामासाठी खते बियाणे व इतर शेती संबंधित साहित्य खरेदी करण्यासाठी फार कठीण जात होते. अशा परिस्थितीमध्ये शासनाने दिलेली ही शेतकऱ्यांना नवीन उमेद पुढे जाण्यास निश्चितच मदत होईल.

हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्ती वारंवार होत आहे. यामध्ये अवकाळी पाऊस गारपीट वादळी वारी अशा नैसर्गिक आपत्ती ची हानी होत आहे. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना बरोबरच दीर्घकालीन उपाययोजना करणे फार गरजेचे आहे. यासाठी हवामान अंदाज प्रणालीचे बळकट असणे आवश्यक आहे. अचूक हवामान अंदाज मिळाल्यास शेतकरी योग्य वेळी योग्य खबरदारी घेऊ शकतात.

लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र होणार जमा

नुकसान भरपाईचा योग्य रीत्या वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वात आधी लाभार्थी यादीमध्ये आपले नाव आहे का हे तपासून खात्री करून घ्यावी. बँक खात्याची माहिती अचूक आणि अद्यावत असल्याची खात्री देखील करावी. मिळालेली नुकसान भरपाई शेतीसाठी योग्यरीत्या वापर करावा पुढील हंगामाचे नियोजनबद्ध पद्धतीने तयारी करावी आणि भविष्यात नुकसान टाळण्यासाठी पिक विमा उतरवावा.

लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र होणार जमा

टीप: अशाच माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

1 thought on “या शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी भरपाई?”

Comments are closed.

error: Content is protected !!